Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावण मास निमित्त अखंड हरिपाठ सेवेची उत्साहात सांगता

 श्रावण मास निमित्त अखंड हरिपाठ सेवेची उत्साहात सांगता




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

९८२२०४११७४ 


निलंगा: निलंगा तालुक्यातील कोकळगाव  येथे शिवाजी माधवराव वाघांना व इंदुबाई शिवाजी वाघांना या दांपत्यानी सव्वीस वर्षापासून नित्य नियमाने स्वतःच्या घरी अखंड हरिपाठाची सेवा करतात. मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी हरिपाठ सेवेची  उत्साहात सांगता कऱण्यात आली.

श्रावण मास निमित्त दररोज सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री भजन असा दिनक्रम होता. गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनेक युवक व युवतीही, महिला व मुले हरिपाठासाठी उपस्थित होते. यावेळी संगीत विशारद विजयकुमार बनसोडे, माजी मुख्याध्यापक विजकुमार बिराजदार, सुरेश सगर, विजय मल्लिकार्जुन बिराजदार, सुरज लोहार, दत्तात्रय मुरमे,संभाजी लामतुरे, महावीर बनसोडे, तुकाराम बनसोडे नरेंद्र लामतुरे, सुमित सुरवसे आदींची उपस्थिती होती. महाप्रसादाच्या कार्यक्रमाने हरिपाठ सेवेची उत्साहात सांगता कऱण्यात आली. सव्वीस वर्षापासून नित्य नियमाने हरिपाठ सेवेची स्वखर्चाने करण्यात येत असलेली सेवा पाहून त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे. 



Post a Comment

0 Comments