Hot Posts

6/recent/ticker-posts

तेरणा परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात

 तेरणा परिसरातील सोयाबीनचे पिके पाण्यात 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

निलंगा :  निलंगा तालुक्यातील कोकळगाव, सांगवी, नदी हत्तरगा कामले वाडी, रामतीर्थ, मदनसुरी आदीं शिवारात 

पावसाने मंगळवारी दुपारनंतर तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील तेरणा परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह तुफान मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेे. मदनसुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह तुफान पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळें शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभे सोयाबीनचे व इतर पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

 जवळपास अडीच तास मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे.

Post a Comment

0 Comments