श्री करी बसवेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कासार शिरसी येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार शिरसी : येथील मठाचे मूळ पुरुष श्री करी बसवेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कासार शिरसी येथील मठात रविवार दिनांक 29 सप्टेंबर पासून अखंड शिवनाम सप्ता व परमरहस्य ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहाची सांगता रविवार दिनांक 29/ 9/ 2024 रोजी शंकर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रासादिक कीर्तनाने करण्यात येणार आहे तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंदिर कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गुरु करी बसवेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने व येथील मठाधिपती मुरगेंद्र स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्त परायण शिवलिंग पाटील कद्दू किंनीकर यांच्या अधिपत्याखाली प्रशांत स्वामी यांच्या सहकार्यांनी शिवपाठ ग्रंथ पारायणासह नित्य महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे
या निमित्त मृगेंद्र स्वामी यांच्या आशीर्वाचनासह मोहन कावडे कैलास महाराज जामकर सौ अंजली पेठे बाल कीर्तनकार शिवानी ताई वसमते लोहगावकर अमोल लांडगे महाराज कीर्ती ताई हिरेमठ व महादेव शिवाचार्य वाईकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस चालणाऱ्या या सप्त्याची सांगता रविवार तारीख 29 रोजी शंभू लिंग शिवाचार्य महाराज व शिवयोगी शंकर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी व पालखी मिरवणुकीने करण्यात येणार आहे पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा अशे आवाहन करण्यात आले आहे
0 Comments