Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अभिष्टचिंतणाला जनसागर उसळला

 माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अभिष्टचिंतणाला जनसागर उसळला 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील त्यांच्या निवासस्थानी संपूर्ण लातूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह निलंगा मतदार संघातील लोकांचा मोठा जनसागर उसळला होता.

दिनांक २० जून २०२४ रोजी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा मतदार संघासह लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृक्षारोपन, गरीब रूग्णांना फळे वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवून आ.निलंगेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. आ.निलंगेकर यांच्या निलंगा येथील निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांसह लोकांनी मोठी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दि केली होती.

मुख्यमंञी एकनाथ शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंञ्यानी फोनवर दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, अजित पवार, मंञी संजय बनसोडे, विनोद तावडे, केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे, पंकजा मुंढे, सामाजिक न्याय मंञी धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांनी फोनवरून आ.निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 भाजपा लातूर जिल्हाद्यक्ष दिलीपराव देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने, प्रेरणा होणराव, अजित पाटील कव्हेकर, शिवसेनेचे सुधीर पाटील, भगवान जाधव, व्यंकट धुमाळ, सकल मराठा समाज निलंगा ईश्वर पाटील, सतिश फट्टे, विनोद सोनवणे, राजकुमार साळुंके, विश्वजित गायकवाड, देविदास काळे, जि.प.माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, किरण उटगे, शैल्यश लाहोटी, रोहित पाटील, शिवाजी रेशमे, प्रसाद मुळे, महमदखाँ पठाण, बापुराव राठोड, गोविंद चिलकुरे, अॕड संभाजी पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, सरपंच स्वरूप धुमाळ, विशाल गोरे, युवराज पवार, शरद सोमवंशी, नागेश जीवने, चाकुर नगर पंचायत अध्यक्ष कपिल माकणे, आदिने भेट घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना दिल्या शुभेच्छा.

राज्यात पहिल्यांदाच नेत्याच्या वाढदिवसानिमित्त झाले ब्रेस्ट कँन्सर निदान शिबीर आकरा महिलांना प्राथमिक स्वरूपात कँन्सर असल्याचे झाले निदान

आक्का फाँडेशन यांच्या सौजन्याने युईलाईफ अँड सायन्स अंजनी माशाळकर फाँडेशन पूणे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ब्रेस्ट कँन्सर तपासणी शिबिरात निलंगा तालुक्यातील एकून ३५० महिलांची तपासणी करण्यात आली यात अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी सीआरएफ महिला व अंगणवाडी मदतनिस सेविका यांचा सहभाग होता.या शिबिरात आकरा महिलांना तपासणी अंती प्राथमिक स्वरूपात कँन्सर असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर आक्का फाँडेशनच्या पुढाकारातून तज्ञ डाँक्टरकडून उपचार करण्यात येणार आहेत.कँन्सर विषयी ग्रामीण भागातील महिलामध्ये  जनजागृती होण्याची गरज असल्याचे डॉ शामली प्रधान यानी या शिबीरादरम्यान सांगितले. 

डॉ शामली प्रधान, डॉ साधिका भोगले, डॉ प्रणाली सावंत आदि तज्ञ डॉक्टरांच्या वतीने अत्यअधुनिक मशीनच्याद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरासाठी युई लाईफ अँड सायन्स अंजली माशाळकर पूणे येथील श्रधा पठारे, श्रीकांत देव, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपान आकेले, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ वडगावे, तालुकाआरोग्य अधिकारी प्रदिपकुमार जाधव, आक्का फाँडेशनचे सुरेश जाधव, प्रणिता केदारे, पुजा सरवदे, राहूल ढाले, सिध्दू डांगे यानी परिश्रम घेतले आहे.

आ.निलंगेकर याना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, संजय दोरवे, शेषराव ममाळे, अॕड.विरभर्द स्वामी, सुमीत इनानी, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिरादार, शाहूराज थेटे, तानाजी बिरादार, देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, मंगेश पाटील, माजी प.स.सदस्य सुभाष म्हेञे, वामनराव भालके, माधव पाटील, दिलीप मिरगाळे, संदीप पाटील, शेखर मिरगाळे, लालू शेख, रावसाहेब आंबेगावे यांच्यासह सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, विविध सामाजिक संघटना, व्यापारी वैद्यकीय क्षेञातील, खत असोशिसेन, आदिने आ.निलंगेकर याना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments