लातूर : मराठवाड्यात कमाल तापमानात चढ-उतार होत असताना दिसत आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मागील आठवड्यात गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. महाराष्ट्रातील इतर भागातही उन्हामुळे नागरिक हैराण झालेले दिसून येत आहे.
ग्रामीण परिसरात वातावरणातील बदलांमुळे तापमानाचा पारा 39.9 अंशांच्या पुढे सरकला असल्यामुळे दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. आज दिवसभरात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे
हवामान विभागाने चार दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून, उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. यामुळे दुपारी खूपच उष्णता जाणवत आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. शिवाय शहरांतील अनेक बाजार पेठेत शुकशुकाटाचे वातावरण पाहावयास मिळते आहे.
0 Comments