आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत कासार सिरसी येथे निराधारांचा एकदिवसीय मेळावा संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी : महाराष्ट्र राज्याच्या अखिल भारतीय मराठवाडा निराधार संघटनेच्या कासार सिरसी शाखेच्या वतीने एकदिवसीय निराधारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचा शुभारंभ आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व मधुकर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधारांच्या एकदिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार पवार म्हणाले, या वेळी निराधारांचे मानधन थकले होते हे मी मान्य करतो,थोड्याच काळात आपले थकीत हप्ते मंजूर करण्यात येतील भविष्यात कासार सिरसी हा तालुका होत असून याबाबतची सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे त्यामुळे आता निराधारांना तालुक्याच्या गावी खेटे मारण्याची गरज नसून यापुढे माझ्या मतदारसंघातील निराधारांसाठी सरकार आपल्या दारी ही संकल्पना राबवणार असून ती सर्व यंत्रणा आपल्यापुढे एका रेषेत उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले की सध्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे हा महाराष्ट्रातल्या कुटुंब व्यवस्थेस लागलेला कलंक आहे तो कलंक या संघटनेला पुसून टाकायचा आहे ते कार्य समर्थपणे आम्ही करत आहोत आमच्या या स्तुत्य उपक्रमास सरकारकडून सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासनाने यापुढे निराधारांचे सर्व प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली या समारंभात चेअरमन गुरुनाथ आप्पा मिलगिरे ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव उजळंबे, उपसरपंच अप्पू चिंचनसुरे, मयूर गबुरे,औरादचे युसूब बडूरे, अशोक कांबळे, विभाग अध्यक्ष दत्ता कांबळे, महिला तालुका अध्यक्ष लता कांबळे, महिला अपंग तालुका अध्यक्ष राजश्री कारागीर, माधव चपटे, गुंडाप्पा ईश्वर मनोहर नवाडे, पांडुरंग चिंचोलीकर, शाम बोयणे, गोपीनाथ शिंदे, बालाजी कांबळे, फेटेवाले केरबा हजारे, सुनील हजारे, युसुफ शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments