कोकळगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे
सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणुका अशा विविध कार्यक्रमांनी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते,. चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले होते. सायंकाळी गाव भागात मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पताका आणि झेंडे व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावलेले होते.
समाजमंदिर परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
सायंकाळी विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये पुरुषांसह महिला व युवतींनीही तुर्रेदार निळे फेटे घालून सहभाग नोंदवला होता. विविध संकल्पनांवर आधारित जय भीमचा उल्लेख असणारे टी-शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेले भीमसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
0 Comments