Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोलीस मुख्यालयात परेडचे आयोजन


पोलीस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पोलीस मुख्यालयात परेडचे आयोजन





मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर :   दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री.शहाजी उमाप हे वार्षिक निरीक्षण व तपासणी पुढील 4 दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्त आज रोजी पोलीस मुख्यालयात पोलीस समारंभ कवायतचे (परेड) आयोजन करण्यात आले होते. समारंभ कवायतचे (परेड) पोलीस उप-महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी निरीक्षण केले.

परेड चे संचालन पोलीस अधीक्षक, श्री सोमय मुंडे, सेकंड इन-कमांड श्री. बि. चंद्रकांत रेड्डी, श्री. सागर खर्डे, IPS परिविक्षाधीन अधिकारी यांनी यांनी केले. 

पोलीस परेड नंतर लातूर पोलीस दलाकडून मॉब डिसपर्सल, किट परेड, लाठी ड्रिल, स्कॉड ड्रिल, वाद्य पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक या पथकाकडून सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली.

  लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अमलदार तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अमलदार यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर स्नेहसंमेलनामध्ये पोलीस उप महानिरीक्षक, श्री शहाजी उमाप यांनी पोलीस अधिकारी अमलदारांच्या अडचणी जाणून घेतल्या व तात्काळ उपायोजना करण्यात आदेश दिले. 

  पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित लातूर जिल्ह्यामधील विविध गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्याच्या कार्यक्रम पोलीस उप-महानिरीक्षक, श्री शहाजी उमाप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने, मोटार सायकल, चारचाकी वाहन तसेच मोबाईल असे एकूण 80 गुन्ह्यातील जवळपास 65 लाख रुपयाचा मुद्देमाल मूळ फिर्यादीं यांना साभार परत देण्यात आला. 

यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपींकडून मुद्देमाल मिळवून आम्हाला परत केला याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments