Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथे महाशिवरात्री निमित्त सामूहिक लिंगपुजा

 कोकळगाव येथे महाशिवरात्री निमित्त सामूहिक लिंगपुजा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756




निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील काशी विश्वनाथ मंदिरात महाशिवरात्र निमित्त सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग, मंदिरात अंखड सुरू असलेल्या 'ओम नम: शिवाय' या नामस्मरणामुळे भारावलेल्या वातावरणात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली.


महाशिवरात्रीनिमित् शिवमंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली होती. रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेली ही मंदिरे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. दिवसभर महारुद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, रात्री कीर्तन,  असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 महाशिवरात्रीनिमित्त फळा-फुलांची आरास करण्यात आली होती. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून शिवलिंगावर साकारलेली ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी सामूहिक लिंगपूजा करण्यात आली.व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी पंचय्या स्वामी, अशोक स्वामी,आदींची उपस्थिती होती.


'एक बेलपान पुरेसे'

 श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलाचे पानदेखील श्रीशंकरास पुरेसे आहे. बेलपानाचे अनेक औषधी उपयोग आहेत. तसेच सर्वांनी श्रध्देने दररोज लिंगपुजन केले पाहिजे असे मत पंचय्या स्वामी यांनी शिवभक्तांना केले.

Post a Comment

0 Comments