Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी घेतला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा

 जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी घेतला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा  आढावा 

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ व औसा या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी येणाऱ्या सर्व निवडणुका सध्याची राजकीय परिस्थिती यासंदर्भात सविस्तर असा आढावा घेऊन मार्गदर्शन केले येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्याने तत्पर राहावे तसेच गाव तिथे शाखा सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शिवसेना मजबूत करावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले. यावेळी माने  म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे हेच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी मोठी शिदोरी असून जनमाणसात पक्षाची प्रतिमा उंचावण्याची योग्य वेळ आलेली आहे आणि पुन्हा शिवसेनेचे ताकद वाढवून एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या आहेत.यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे,उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई बिरादार, शिरूर आनंदपाल तालुकाप्रमुख विकास शिंदे, देवणी तालुकाप्रमुख धनंजय बिरादार ,निलंगा तालुका प्रमुख भगवान जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख विधीज्ञ शिंदे  तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments