कासार सिरशीत औसा विधान सभेचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारार्थ रेकार्ड ब्रेक सभा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी: औसा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनकरराव माने यांच्या प्रचारार्थ आयोजित कासार शिरसी येथील महाविकास आघाडीच्या महासभेला महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा मोठया उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना औसा तालुकावाशीयांचे मने जिंकली व जनतेचे आभार देखील मानले.
यानंतर काँग्रेस आमदार अमितजी देशमुख, खा. ओमराजे निंबाळकर यांनीही भाषणात विरोधकांचा चौफेर समाचार घेत सभा गाजवली.
या प्रसंगी औसा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, तर अमित शाह गृहमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायक नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची लातूर येथे पुन्हा तपासणी
लातूर जिल्ह्यातल्या कासार सिरसी हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सामानांची तपासणी केली आहे.यावेळी ठाकरे म्हणाले की माझी झडती घ्या,पण मला एक न्याय आणि मोदी शहा यांना एक न्याय असे करु नको असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
Post a Comment
0
Comments
Social Plugin
जाहिरात
सुचना
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ""graminvartapatra""आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: graminvartapatra"/सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
जाहिरात
जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क साधा. मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 9822041174
0 Comments