Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासी कोळी समाजाचे निलंगा येथे दंडवत आंदोलन

 आदिवासी कोळी समाजाचे निलंगा येथे दंडवत आंदोलन

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

९८२२०४११७४ 


निलंगा : गुरूवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी निलंगा येथे आदिवासीं कोळी समाजाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील आदिवासीं कोळी समाजाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दंडवत आंदोलन करण्यात आले आहे.

कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासी कोळी टोकरे कोळी ढोर कोळी,महादेव कोळी मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह इतर सामाजिक विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे निलंगा येथे दंडवत आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या विविध  मागण्या शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी मराठवाड्यातील अबालवृद्ध तरूण विदयार्थी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments