Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताचा सागर होय महेश महाराज माकणीकर - किसन खोबरे परमार्थधन पुरस्काराने सन्मानित

 ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताचा सागर होय 

महेश महाराज माकणीकर 

किसन खोबरे परमार्थधन पुरस्काराने सन्मानित 

 

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

९८२२०४११७४

निलंगा: प्रतिवर्षाप्रमाणे  कै. कांतिका मोरे बालसंस्कार केंद्र सांगवी येथे भाद्रपद षष्ठी दिवशी ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते या निमित्ताने महेश महाराज यांचे कीर्तनसेवा आयोजित करण्यात आले होते, सात दिवसापासून सुरु असलेल्या पारायण सोहळा  व शेवटच्या दिवशी म्हणजे  दिवशी महेश महाराज माकणीकर यांचे कीर्तन झाले व त्याचबरोबर गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज दिंडी गावकर यांच्या शुभ हस्ते पसायदान संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी परमार्थधन पुरस्कार प्रदान करण्यात येत असे त्या अनुसंगाणे तो पुरस्कार सांगवी पंचक्रोशीतील प्रख्यात गायनाचार्य तथा परमार्थ प्रेमी श्री ह.भ. प.किसन  खोबरे यांना देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत भाविक भक्त वाचक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

मानवी जीवनात दुःख नको असेल आणि संकटे नको असतील तर संताच्या शब्दास जागले पाहिजे. आणि त्या साठी ज्ञानेश्वरीचे मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन या वेळी महेश महाराज माकणीकर यांनी केले.




Post a Comment

0 Comments